बुधवार, ३ एप्रिल, २०२४

स्वातंत्र्यवीर सावरकर ...

 

स्वातंत्र्यवीर सावरकर ... 


आधी तर ना ते 'स्वतंत्रवीर सावरकर ' म्हणणं बंद करा हो .. 'स्वातंत्र्यवीर' म्हणा . दोन reviews देईन ..एक चित्रपट म्हणून आणि एक घटना म्हणून 

चित्रपट म्हणजे कलाकृती म्हणुन ठीक आहे ..अजून चांगला होऊ शकला असता.. पहिला भाग फार फास्ट वाटला ..ज्यांना तो इतिहास माहित आहे ..मदनलाल धिंग्रा ,खुदिराम बोस ,चापेकर बंधु वेगैरे त्यांना कळेल पण मुलांना हे सगळं माहित नाही सो त्यांच्यासाठी फास्ट आहे .. 

रणदीप हुड्डा चांगला ऍक्टर आहेच..वि दा  म्हणुन शोभुन दिसलाय अगदी.  त्याचं विशेष कौतुक ह्या विषयावर लेखन,दिग्दर्शन आणि निर्मिती केल्याबद्दल .. सेकंड हाफ  खिळवून ठेवणारा आहे आणि शेवट पण  छान.माहित नसलेला आणि माहित असावा असा.  

आता घटना म्हणुन अभिप्राय .घटना ,डायलॉग्ज ,सुसूत्रता छान दाखवली आहे . सावरकरांना शिक्षा झाली नसती तर? तर  त्यांचा स्वातंत्र्यसंग्रामाला खुपच चांगला हातभार लागला असता हे पटले.इतिहास काही वेगळा असता . ते लंडन ला गेले नसते आणि भारतातच राहिले असते तर बरे झाले असते असेही  वाटले एकवेळ . पण बाबारावांनी अभिनव भारत सांभाळले म्हणुन त्यांना सावरकरांच्या आधी काळ्यापाण्याची शिक्षा झालीच ना .म्हणजे ते प्रारब्धच होते . त्यांनी लंडन मध्ये शिक्षण पुर्ण करून कार्य करायला हवे होते का . कामाचे स्वरुप जरा वेगळे ठेवले असते तर..असे बरेच विचार मनात येऊन गेले . पण ते टिळक प्रेरित होते म्हणून काहीही झाले तर ते क्रांतिकारकच  राहिले असते . सावरकरांच्या बायकोचा संघर्ष फार उठुन दाखवण्यात आला नाही चित्रपटात . ते बऱ्याच पुस्तकांमधून छान मांडलेले आहे . 

पोलिटिकल प्रिजनर्सची शिक्षा माफ व्हावी ही विनंती रास्तच होती .त्याची कारणेही रास्त होती .बघा ना सावरकर कैदेत राहिल्यामुळे आपण त्यांच्या ज्ञानापासून दुरापास्तच राहिलो . त्या शब्दात ब्रिटिशांना पत्र लिहिणे हि काळाची गरज होती हे चित्रपटात पटावे असे सादर केले आहे . आपण एखाद्या घटनेचे नाटकी रूपांतरण पाहतो तेव्हा घटना व्यवस्थित कळते. हे ह्या चित्रपटानेही साध्य केले आहे . शिवाय कसला भपकेबाजपणा नाही कि मोठेपणा नाही . फक्त एक.  'ने मजसी ने' आणि त्यांच्या काही कविता जश्याच्या तश्या घातल्या असत्या तर ह्या मराठी मनाला काय छान वाटले असते अहाहा .. 

बघून या मग चित्रपट..कि नेटफ्लिक्स वर येण्याची वाट पाहताय?



मंगळवार, २६ मार्च, २०२४

पीठ मिरची !!


 पीठ मिरची !!

तिखट मिरची चे बारीक काप करून घ्या . एका काळ्या वाटीत नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात हे मिरचीचे काप टाका. आता ह्या तेलात बसेल एवढेच चणाडाळीचे पीठ पेरा .अगदी ४-५ थेंब पाणी घाला . वाफ येऊ द्या आणि पीठ मिरची तयार. आपण मिठभुरका करतो त्यातलाच हा प्रकार आहे.हि रेसिपी मी आईंकडून शिकले. 



टिफिन सांबार

 सांबार मधून भाज्या बाजूला काढणाऱ्या द्वाड मुलांसाठी झटपट होणारी फक्कड रेसिपी....



टिफिन सांबार 

सांबार मध्ये एरवी घालता त्या भाज्या म्हणजे बटाटे ,दुधी ,लाल भोपळा ,टोमॅटो ,वांगी ,शेवगा आणि हव्या त्या कुकर मध्ये थोडेसे पाणी घालून  शिजवून घ्या . डाळ घालावीच असे काही नाही . २ शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंड झाला कि कुकर उघडुन त्यातले पाणी वेगळे करून ,भाज्या चांगल्या स्मॅश करून घ्या . एका कढईत नेहमीचीच फोडणी जसे तेल,मोहरी ,हिंग जिरे करून त्यात स्मॅश केलेल्या भाज्या घाला . हळद ,तिखट आणि सांबर मसाला घालुन भाजी छान परतून घ्या. आधी भाज्यामधून वेगळे केले होते ते पाणी ह्यात ऍड करा.वरून कोथिंबीर घालून छान  उकळी येऊ द्या आणि गरमागरम इडलीबरोबर मस्त सर्व करा. 

                                            

बुधवार, १३ मार्च, २०२४

Tears

 When alone,

I shed some tears,

I know now,

I can't do more.


I think and,

I miss and,

I pity myself,

But then I,

Gather me

To play,

The game,

Called Everyday


I know,

You may,

Feel different,

Than me,

Oh you must,

M sure,

Then alone,

I shed,

Some tears,

Coz I know,

I can't do more.

मंगळवार, १२ मार्च, २०२४

Rutuchakra

         प्रत्येक ऋतूचं वेगळंच महत्त्व आहे . ऋतु सरत आला की हवाहवासा वाटतो . मला सरत आलेली थंडी आणि येऊ घातलेला उन्हाळा हा काळ नेहमीच आवडतो . हा काळ म्हणजे साधारण जानेवारी ते मार्च . काही वेगळाच उत्साह आहे ह्या काळात . थंडी नको नको होत असते आणि हळुहळु उन्हाळ्याची चाहूल लागत असते . म्हणजे सकाळी आणि रात्री थंडी आणि दुपारी उन्हाळ्याचं पण चटका न देणारं ऊन असतं .सूर्यास्त मस्त दिसायला लागतो . दिवस मोठा होत असतो . हा एवढा मोठा दिवस कसा कसा सत्कारणी लावायचा ह्याचं प्लँनिंग आपण करत असतो . ह्या दिवसात बरीच कामं होतात . माझी तरी . उन्हाळा सरत आल्यावरही पाहा पावसाची चाहूल लागते . मग पाऊस बास आता होतो आणि थंडी येते. आणि हे ऋतुचक्र असंच चालत राहतं . आपल्याला नव्या आशा देत. निसर्गालाही बदल हवा असतो . तसाच आपल्यालाही . जरा बदल केला की उत्साह वाढतो . बघुया मग जरा बदल करुन आपणही . इप्सित नक्कीच साध्य होणार .


सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

Behind Ganesh Idol Establishment,10 days of worship and Immersion

 Behind Ganesh Idol Establishment,10 days of                         worship and Immersion

As we all know, most of the Indian festivals are in accordance with the agricultural harvests, so is the Ganesh festival. In fact almost all festivals in the world are complementary to the weather and harvests of that part.
Lets see how Ganesh and Gauri Festivals are complementary to the monsoon in Indian weather and harvests.
In monsoon, because of rains, large amount of soil is drifted away. Making idols from the farm soil is one solution farmers came up with. They would make idols, worship them and again immerse these idols in their farms. Yes, this is another way to immerse our idols than immersing them in river/water.
So what will be the best eco friendly idol I make? Ofcourse farm soil itself. If not farm soil, any eco friendly soil like Kali mati, chikaN mati, Shadu mati, Geru.Colours? Haldi, Geru, charcoal and any natural colour. Commercial colours are obviously not eco friendly but choose water colours amongst them.
Lock down taught me to celebrate festivals with hand made, home made things. Since then I decided to choose stuff that is available at home for festivals or Pujas. I tried to follow no spends policy for festivals at home. Few things are unavoidable but I try my best. Handmade, home made things give more joy than from outside.
I believe we are trapped in festivals=expenditure trap. We are paying a lot in the name of demand and supply in the market for festivals. Do we even care for the things we purchase for festivals once the festivals are over? Do we know meanings of the rituals we are following ? Think about it.
Why were rituals or customs made? For example why do we cede Kewra leaf to Ganesh? Because cultivating Kewra plant completes the Nature cycle.
That is why I emphasize on planting local trees. They know their roots and help mother nature to take care of herself.
It is good that we have questions about all rituals we follow and we are seeking answers and they make sense now.
There are so many such examples which can not be covered by this small article.
Happy Ganesh Chaturthi to All !!

सोमवार, ५ जून, २०२३

#इनलव्हविथPCMC

 #इनलव्हविथPCMC

             नोकरी मिळाली आणि मी पुण्यात स्थायिक होण्यासाठी धडपड करू लागले.आई,बहीण आणि भाऊ सोबतीला आले.त्यांना इथे कॉलेजात ऍडमिशन घेतली.वाचन भरपूर,वाचा शुद्ध आणि नाटकात काम करणे,नाटकं पाहणे हे छंद असल्यामुळे पटकन रुळले इथे.खरंतर आम्ही सगळेच छान रुळलो.मित्रकॅम्पनी खूपच छान मिळाली.एकदा "तुला शिकवीन चांगलाच धडा" केलं आणि सगळे "मंजू" म्हणायला लागले मला.खूपच छान आठवणी आहेत."गोखले" सरांना आयुष्यात विसरू शकणार नाही मी.तुमच्यापैकी बरेचजण त्यांना ओळखंतही असाल.कसबा पेठेत क्लासेस आहेत त्यांचे."Operating Systems"  चे.माझे सगळ्यात आवडते न आदर्श सर.नोकरी लागली ,चार पैसे हातात येणार म्हणून आम्ही आनंदात "सुभद्रा" ला गेलो सहज,तर काय,चक्क सर समोर...आम्ही भारावून गेलेलो..तिथेच सरांना लोटांगणांना सुरुवात झाली,सगळे आमच्याकडे वेडयासारखं पाहत होते.मग प्रत्येकाने आपापला तपशील सांगितला न मग कुठे खाल्लं.

   असो .मग काय बाब्बा..माझी फॅमिली सोबत,इतका चांगला मित्रपरिवार..माझ्यासारखी मीच झाले होते..आनंदी आनंद गडे..इकडे तिकडे चोहीकडे...तर ..दुसऱ्या पगारात आमच्या ग्रुपने दुचाक्या घेतल्या..अन एक रस्ता नाही ना सोडला पुण्याचा..दगडूशेठ,सारसबाग,सिंहगड,पानशेत रेस्तराँ मध्ये श्रेयस,दुर्वांकुर,पंचमी,कामत सगळं सगळं झालं.विकेंडला तर JM road वर पडीक असायचो.आयुष्यावर बोलू काही अगदी तोंडपाठ.किती नाटकं झाली न कित्येक चित्रपट.पुण्यावर प्रेम जडलं.तेव्हा pcmc काही आवडायचं नाही बुआ.आम्ही सांगावीत राहायचो तरीही.लग्नानंतर ऑफिस जवळ विश्रांतवाडीला राह्यलो काही दिवस.मग काय चारचौघांसारखा "वाकड"  ला फ्लॅट बुक केला.काही वर्षांनी शिफ्ट हि झालो.पण पुण्यावरचं प्रेम काही कमी झालं नाही."अरे किती हे लांब पडतं पुण्यात जायला" हि नेहमीची कंप्लेंन माझी.

हो मग अजूनही प्रत्येक गोष्ट पुण्यात जाऊनच आणते मी.पेशवाई म्हणा कि रविवार पेठेतली शॉपिंग,मिसळ म्हणा अथवा अगदी हेअर कट हि FC road वरच.पाहता पाहता वाकड मध्ये राह्यला लागून 5-6 वर्ष झाली.एवढ्या वर्षात ह्या pcmc मध्ये इतका बदल झालाय म्हणून सांगू.पुणे मुंबई हायवे आत्ता आहे तसा अजिबात नव्हता हो.आता COEP पासून सुरु झालो कि अगदी मुंबई पर्यंत थांबायची गरज नाही.अगदी "इथून दोरी टाकली अन मुंबई ला जाऊन टेकली" असं.नाशिक फाट्यापासून पिंपळे सौदागर पर्यंत येणारा ब्रिज माहीतच असेल.कसला भारी आहे.काळेवाडी फाट्यापासून थेट सायन्स पार्क कडं जाणारा ब्रिज पाहायला का? खूपच छान झालाय.चिंचवडला नवीन बाग झालीय तिचा तर वर्तमान पत्रात लेखही आलेला.खूप सुरेख बाग आहे."स्वामी" वाचणाऱ्यांनी एकदाही मोरया गोसावी ला भेट दिली नसेल हे अशक्यच.शिवाय पावसाळ्यात ट्रेक ला जाव्यात अश्या बऱ्याच जागा इथून जवळ आहेत.

             ऑफीस मधून निघाल्यानंतर सेनापती बापट रोड वरून वाकड कडे येताना कधी एकदाचं औंध येतंय असं होतं मला.औंध संपलं की pcmc सुरू होतं.आणि हुश्श व्हायला लागतं.मस्त मोट्ठे रस्ते.चांगले ब्रिज.मस्त ट्राफिक.जास्त असेल तरीही असं वाटत नाही हो.भरपूर जागा आहे.तर आवाडायला लागलंय आता इकडेच.

          बरेच प्रोग्रॅम्स चालतात इकडे.इथले नागरिकही बरेच सजग आहेत.पिंपळे सौदागर,गुरव आणि वाकड ह्या चांगल्याप्रकारे मेंटेन केलेले भाग आहेत.काय नाही मिळत सांगा आता इकडे.कमी प्रदूषणामुळे वातावरणहि थंड आहे.शिवाय बरेच ऑफिसेस जवळ आहेत.का नाही पडणार मग कुणी प्रेमात.तशीच मी पण पडलेय.इन लव्ह विथ pcmc..देणार ना मग एकदा भेट!