मंगळवार, १२ मार्च, २०२४

Rutuchakra

         प्रत्येक ऋतूचं वेगळंच महत्त्व आहे . ऋतु सरत आला की हवाहवासा वाटतो . मला सरत आलेली थंडी आणि येऊ घातलेला उन्हाळा हा काळ नेहमीच आवडतो . हा काळ म्हणजे साधारण जानेवारी ते मार्च . काही वेगळाच उत्साह आहे ह्या काळात . थंडी नको नको होत असते आणि हळुहळु उन्हाळ्याची चाहूल लागत असते . म्हणजे सकाळी आणि रात्री थंडी आणि दुपारी उन्हाळ्याचं पण चटका न देणारं ऊन असतं .सूर्यास्त मस्त दिसायला लागतो . दिवस मोठा होत असतो . हा एवढा मोठा दिवस कसा कसा सत्कारणी लावायचा ह्याचं प्लँनिंग आपण करत असतो . ह्या दिवसात बरीच कामं होतात . माझी तरी . उन्हाळा सरत आल्यावरही पाहा पावसाची चाहूल लागते . मग पाऊस बास आता होतो आणि थंडी येते. आणि हे ऋतुचक्र असंच चालत राहतं . आपल्याला नव्या आशा देत. निसर्गालाही बदल हवा असतो . तसाच आपल्यालाही . जरा बदल केला की उत्साह वाढतो . बघुया मग जरा बदल करुन आपणही . इप्सित नक्कीच साध्य होणार .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: