स्वातंत्र्यवीर सावरकर ...
आधी तर ना ते 'स्वतंत्रवीर सावरकर ' म्हणणं बंद करा हो .. 'स्वातंत्र्यवीर' म्हणा . दोन reviews देईन ..एक चित्रपट म्हणून आणि एक घटना म्हणून
चित्रपट म्हणजे कलाकृती म्हणुन ठीक आहे ..अजून चांगला होऊ शकला असता.. पहिला भाग फार फास्ट वाटला ..ज्यांना तो इतिहास माहित आहे ..मदनलाल धिंग्रा ,खुदिराम बोस ,चापेकर बंधु वेगैरे त्यांना कळेल पण मुलांना हे सगळं माहित नाही सो त्यांच्यासाठी फास्ट आहे ..
रणदीप हुड्डा चांगला ऍक्टर आहेच..वि दा म्हणुन शोभुन दिसलाय अगदी. त्याचं विशेष कौतुक ह्या विषयावर लेखन,दिग्दर्शन आणि निर्मिती केल्याबद्दल .. सेकंड हाफ खिळवून ठेवणारा आहे आणि शेवट पण छान.माहित नसलेला आणि माहित असावा असा.
आता घटना म्हणुन अभिप्राय .घटना ,डायलॉग्ज ,सुसूत्रता छान दाखवली आहे . सावरकरांना शिक्षा झाली नसती तर? तर त्यांचा स्वातंत्र्यसंग्रामाला खुपच चांगला हातभार लागला असता हे पटले.इतिहास काही वेगळा असता . ते लंडन ला गेले नसते आणि भारतातच राहिले असते तर बरे झाले असते असेही वाटले एकवेळ . पण बाबारावांनी अभिनव भारत सांभाळले म्हणुन त्यांना सावरकरांच्या आधी काळ्यापाण्याची शिक्षा झालीच ना .म्हणजे ते प्रारब्धच होते . त्यांनी लंडन मध्ये शिक्षण पुर्ण करून कार्य करायला हवे होते का . कामाचे स्वरुप जरा वेगळे ठेवले असते तर..असे बरेच विचार मनात येऊन गेले . पण ते टिळक प्रेरित होते म्हणून काहीही झाले तर ते क्रांतिकारकच राहिले असते . सावरकरांच्या बायकोचा संघर्ष फार उठुन दाखवण्यात आला नाही चित्रपटात . ते बऱ्याच पुस्तकांमधून छान मांडलेले आहे .
पोलिटिकल प्रिजनर्सची शिक्षा माफ व्हावी ही विनंती रास्तच होती .त्याची कारणेही रास्त होती .बघा ना सावरकर कैदेत राहिल्यामुळे आपण त्यांच्या ज्ञानापासून दुरापास्तच राहिलो . त्या शब्दात ब्रिटिशांना पत्र लिहिणे हि काळाची गरज होती हे चित्रपटात पटावे असे सादर केले आहे . आपण एखाद्या घटनेचे नाटकी रूपांतरण पाहतो तेव्हा घटना व्यवस्थित कळते. हे ह्या चित्रपटानेही साध्य केले आहे . शिवाय कसला भपकेबाजपणा नाही कि मोठेपणा नाही . फक्त एक. 'ने मजसी ने' आणि त्यांच्या काही कविता जश्याच्या तश्या घातल्या असत्या तर ह्या मराठी मनाला काय छान वाटले असते अहाहा ..
बघून या मग चित्रपट..कि नेटफ्लिक्स वर येण्याची वाट पाहताय?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा