आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ
आज काय केले ,उद्याचे काय प्लँनिंग ,
कशाला उगीच डोक्याला खुराक?
आजचा दिवस मस्त खाऊन पिऊन मजेत राहू ,
आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ
हा का असं बोलला ,ती का तशी वागली ,
जाऊद्याना हो ,मनावर नका घेऊ
आपण मात्र सगळ्यांशी सौजन्याने वागत राहू ,
आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ .
असे केले असते तर बरे झाले असते ,
तसे केले असते तर चुकलेच असते ,
पण झाले गेले ,छानच झाले ,असे गाणे गात राहू .
आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ.
हे खाल्ल्याने फायदा होईल ,
ते प्याल्याने नुकसान होईल,
पण नाहीच चाखले तर राहूनच जाईल ,
म्हणून हवे ते पण अप्रमादात चाखत राहू ,
आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ
काल संपला की त्याचा विचार नाही करायचा,
उद्या येतोय ,त्याला तरी का धरायचा.
आजचा मात्र दिवस मस्त जगत जाऊ ,
आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ.
मी असा न माझे असे सगळे ,
भ्रम तुझा वेड्या , कुणाचेच नाही वेगळे .
ह्या ज्ञानाची उकल करून सज्ञानी होत राहू,
आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ
करता करविता तोच ,
आज उद्या ठरवणाराही तोच ,
आपण फक्त निशचिन्त होऊन आपले कर्तव्य करत राहू,
आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा