सोमवार, २० मे, २०२४

आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ

 आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ 


आज काय केले ,उद्याचे काय प्लँनिंग ,

कशाला उगीच डोक्याला खुराक?

आजचा दिवस मस्त खाऊन पिऊन मजेत राहू ,

आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ


हा का असं बोलला ,ती का तशी वागली ,

जाऊद्याना हो ,मनावर नका  घेऊ 

आपण मात्र सगळ्यांशी सौजन्याने वागत राहू ,

आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ . 


असे केले असते तर बरे झाले असते ,

तसे केले असते तर चुकलेच असते ,

पण झाले गेले ,छानच झाले ,असे गाणे गात राहू . 

आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ. 


हे खाल्ल्याने फायदा  होईल ,

ते प्याल्याने नुकसान होईल,

पण नाहीच चाखले तर राहूनच जाईल ,

म्हणून हवे ते पण अप्रमादात चाखत राहू ,

आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ


काल संपला की त्याचा विचार नाही करायचा,

उद्या येतोय ,त्याला तरी का धरायचा. 

आजचा मात्र दिवस मस्त जगत जाऊ ,

आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ. 


मी असा न माझे असे सगळे ,

भ्रम तुझा वेड्या , कुणाचेच नाही वेगळे . 

ह्या ज्ञानाची उकल करून सज्ञानी होत राहू,

आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ 


करता करविता तोच ,

आज उद्या ठरवणाराही तोच ,

आपण फक्त निशचिन्त होऊन आपले कर्तव्य करत राहू,

आला दिवस आनंदात पुढे ढकलत जाऊ !!

बुधवार, १५ मे, २०२४

म्हणी आणि शायरी

   चालना कुठं ,बडवली भटं !!


 चंपा तेरे  गुण है तीन , रंग रूप और वास . अवगुण तुझमे एक हि ,भंवर ना आये पास .