सोमवार, ५ जून, २०२३

#इनलव्हविथPCMC

 #इनलव्हविथPCMC

             नोकरी मिळाली आणि मी पुण्यात स्थायिक होण्यासाठी धडपड करू लागले.आई,बहीण आणि भाऊ सोबतीला आले.त्यांना इथे कॉलेजात ऍडमिशन घेतली.वाचन भरपूर,वाचा शुद्ध आणि नाटकात काम करणे,नाटकं पाहणे हे छंद असल्यामुळे पटकन रुळले इथे.खरंतर आम्ही सगळेच छान रुळलो.मित्रकॅम्पनी खूपच छान मिळाली.एकदा "तुला शिकवीन चांगलाच धडा" केलं आणि सगळे "मंजू" म्हणायला लागले मला.खूपच छान आठवणी आहेत."गोखले" सरांना आयुष्यात विसरू शकणार नाही मी.तुमच्यापैकी बरेचजण त्यांना ओळखंतही असाल.कसबा पेठेत क्लासेस आहेत त्यांचे."Operating Systems"  चे.माझे सगळ्यात आवडते न आदर्श सर.नोकरी लागली ,चार पैसे हातात येणार म्हणून आम्ही आनंदात "सुभद्रा" ला गेलो सहज,तर काय,चक्क सर समोर...आम्ही भारावून गेलेलो..तिथेच सरांना लोटांगणांना सुरुवात झाली,सगळे आमच्याकडे वेडयासारखं पाहत होते.मग प्रत्येकाने आपापला तपशील सांगितला न मग कुठे खाल्लं.

   असो .मग काय बाब्बा..माझी फॅमिली सोबत,इतका चांगला मित्रपरिवार..माझ्यासारखी मीच झाले होते..आनंदी आनंद गडे..इकडे तिकडे चोहीकडे...तर ..दुसऱ्या पगारात आमच्या ग्रुपने दुचाक्या घेतल्या..अन एक रस्ता नाही ना सोडला पुण्याचा..दगडूशेठ,सारसबाग,सिंहगड,पानशेत रेस्तराँ मध्ये श्रेयस,दुर्वांकुर,पंचमी,कामत सगळं सगळं झालं.विकेंडला तर JM road वर पडीक असायचो.आयुष्यावर बोलू काही अगदी तोंडपाठ.किती नाटकं झाली न कित्येक चित्रपट.पुण्यावर प्रेम जडलं.तेव्हा pcmc काही आवडायचं नाही बुआ.आम्ही सांगावीत राहायचो तरीही.लग्नानंतर ऑफिस जवळ विश्रांतवाडीला राह्यलो काही दिवस.मग काय चारचौघांसारखा "वाकड"  ला फ्लॅट बुक केला.काही वर्षांनी शिफ्ट हि झालो.पण पुण्यावरचं प्रेम काही कमी झालं नाही."अरे किती हे लांब पडतं पुण्यात जायला" हि नेहमीची कंप्लेंन माझी.

हो मग अजूनही प्रत्येक गोष्ट पुण्यात जाऊनच आणते मी.पेशवाई म्हणा कि रविवार पेठेतली शॉपिंग,मिसळ म्हणा अथवा अगदी हेअर कट हि FC road वरच.पाहता पाहता वाकड मध्ये राह्यला लागून 5-6 वर्ष झाली.एवढ्या वर्षात ह्या pcmc मध्ये इतका बदल झालाय म्हणून सांगू.पुणे मुंबई हायवे आत्ता आहे तसा अजिबात नव्हता हो.आता COEP पासून सुरु झालो कि अगदी मुंबई पर्यंत थांबायची गरज नाही.अगदी "इथून दोरी टाकली अन मुंबई ला जाऊन टेकली" असं.नाशिक फाट्यापासून पिंपळे सौदागर पर्यंत येणारा ब्रिज माहीतच असेल.कसला भारी आहे.काळेवाडी फाट्यापासून थेट सायन्स पार्क कडं जाणारा ब्रिज पाहायला का? खूपच छान झालाय.चिंचवडला नवीन बाग झालीय तिचा तर वर्तमान पत्रात लेखही आलेला.खूप सुरेख बाग आहे."स्वामी" वाचणाऱ्यांनी एकदाही मोरया गोसावी ला भेट दिली नसेल हे अशक्यच.शिवाय पावसाळ्यात ट्रेक ला जाव्यात अश्या बऱ्याच जागा इथून जवळ आहेत.

             ऑफीस मधून निघाल्यानंतर सेनापती बापट रोड वरून वाकड कडे येताना कधी एकदाचं औंध येतंय असं होतं मला.औंध संपलं की pcmc सुरू होतं.आणि हुश्श व्हायला लागतं.मस्त मोट्ठे रस्ते.चांगले ब्रिज.मस्त ट्राफिक.जास्त असेल तरीही असं वाटत नाही हो.भरपूर जागा आहे.तर आवाडायला लागलंय आता इकडेच.

          बरेच प्रोग्रॅम्स चालतात इकडे.इथले नागरिकही बरेच सजग आहेत.पिंपळे सौदागर,गुरव आणि वाकड ह्या चांगल्याप्रकारे मेंटेन केलेले भाग आहेत.काय नाही मिळत सांगा आता इकडे.कमी प्रदूषणामुळे वातावरणहि थंड आहे.शिवाय बरेच ऑफिसेस जवळ आहेत.का नाही पडणार मग कुणी प्रेमात.तशीच मी पण पडलेय.इन लव्ह विथ pcmc..देणार ना मग एकदा भेट!